महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची यशस्वी वाटचाल

महाराष्ट्र शासन व विद्यापीठे यांनी संयुक्तरित्या स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित’ (MKCL) या संस्थेने ज्ञानयुगातील विकासाच्या नवनवीन संधी माहिती तंत्रज्ञानाच्या समुचित वापरातून महाराष्ट्रातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. या प्रयत्नातून नव्या परिवर्तनशील ई-शिक्षणाचे अभिनव प्रारूप साकारत आहे आणि त्याला आपल्या देशात व परदेशात उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ई-शिक्षणाबराबरच महामंडळाने अभिनव ई-प्रशासन सेवा व ई-सबलीकरण सेवा राज्यात सर्वदूर उपलब्ध करुन लक्षावधी नागरिकांना डिजीटल तंत्रज्ञानाचे फायदे दैनंदिन जीवनात घेण्याची संधी प्राप्त करुन दिली आहे.

MKCL चे राज्यव्यापी महानेटवर्क

  • संपूर्ण महाराष्ट्रात संगणक प्रशिक्षणाकरिता ५५००हून अधिक अधिकृत अध्ययन केंद्रांचे महानेटवर्क.
  • अद्ययावत हार्डवेअर व सॉफ्टवेअर्सने सुसज्ज असलेले ६५००० इंटरनेट-रेडी संगणकाचे राज्यव्यापी जाळे.
  • राज्यातल्या शहरी, निमशहरी, ग्रामीण, आदिवासी व डोंगराळ भागांतही नेटवर्कमार्फत सक्षम ई-लर्निंग, ई-प्रशासन व ई-सबलीकरण सेवा व सुविधांचे वितरण.
  • ई-शिक्षण, ई-गव्हर्नन्स व ई-एंपॉवरमेंट क्षेत्रात राज्यव्यापी सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ व बौद्धिक संपदा निर्मिती.

विविध उपक्रम व सेवा

  • महाराष्ट्रातील ९५ लाख जिज्ञासूंना गेल्या १४ वर्षांत MS-CIT (Maharashtra State Certificate Course in Information Technology) या माफक शुल्कातील, अद्ययावत व परिपूर्ण कंप्यूटर कोर्समार्फत मराठी/इंग्रजीतून दर्जेदार प्रशिक्षण व त्यामार्फत महाराष्ट्राला देशातील पहील्या क्रमांकाचे संगणक साक्षर राज्य बनविण्यात यश.
  • विद्यार्थ्यांसाठी नव्या डिजिटल करियर्सची दिशा - ‘क्लिक कोर्सेस’ म्हणजेच Knowledge Lit Careers(KLiC): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त रोजगारभिमुख व्यावसायिक प्रशिक्षण देणारे २० नवे अभ्यासक्रम.
  • MKCLच्या ERA (eLearning Revolution for All) या ई लर्निंग प्रणालीद्वारे MS-CIT व KLiC कोर्सेसचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण महानगरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत राज्यभर समान गुणवत्तेसह सर्वत्र सदैव उपलब्ध. एक कोटीहून अधिक विध्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. अनेक कौशल्ये येणारे अनुभवी प्रशिक्षक गावात नसले तरीही ERA मुळे विद्यार्थी नवी डिजिटल कौशल्ये व करियर संधींपासून आता महाराष्ट्रात कोठेही वंचित राहत नाही.
  • IT क्षेत्रातील उत्कृष्ट मानव संसाधन विकास कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा HRD पुरस्कार २००४ साली MKCLला प्रदान .
  • राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ‘Mastering’ ब्रँडअंतर्गत ऑनलाईन तसेच ऑफलाईन सराव परीक्षा.
  • ‘ओअॅसिस’ (OASIS-Online Application Solutions and Integrated Services) या संगणक प्रणालीतून एकूण १ कोटी ४५ लाख विद्यार्थ्यांना आणि नोकरीइच्छुक अर्जदारांना महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, ओरिसा, छत्तीसगड, राजस्थान, बिहार या राज्यांमधील अभ्यासक्रमांसाठी सुलभ ऑनलाईन प्रवेश सुविधा, शासकीय /निम शासकीय, सहकारी व खाजगी क्षेत्रातील रोजगारांसाठी ऑनलाईन भरती अर्ज सुविधा ऑनलाईन माहिती सेवा व ऑनलाईन परीक्षा सुविधा. या सुविधाअंतर्गत लाखो अर्जदारांची पारदर्शक पद्धतीने नोकरीसाठी निवड.
  • डिजीटल युनिव्हर्सिटी(DU-Digital University) प्रकल्पामार्फत महाराष्ट्रातील ११ विद्यापीठे, गुजरातमधील ३, हरियाणातील ५, ओरिसातील ३ अशा एकूण २२ विद्यापीठांतील ६० लाखहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशासकीय व शैक्षणिक ई-सुविधा.
  • ‘Bachelor of Business Administration (BBA)’ हा ‘MKCL फिनिशिंग स्कूल’अंतर्गत कमाईतून पदवीकडे नेणारा, बारावीनंतरचा रोल-बेस्ड् पदवी अभ्यासक्रम. शिक्षण, अनुभव आणि अर्निग एकाचवेळेस...
  • विद्यार्थी युवक-युवतींना ऑनलाईन कमाईचा व डिजिटल फ्रीलांसिंगचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा याकरिता ‘अर्निग असिस्टंटस् सर्व्हीसेस टु युथ – EASY’ या पोर्टलची निर्मिती.
  • विधिमंडळातील कामकाजाच्या सुसूत्रीकरणासाठी ‘ई-लेजिस्लेचर’ (eLegislature) अर्थात ई विधानमंडळ ही संगणक प्रणाली.
  • ‘मुख्यमंत्री इंटर्नशीप उपक्रमा’करिता योग्य उमेदवारांच्या निवड प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रणाली व सेवा.
  • ‘नर्चरन्स ऑफ एक्सलन्स अँड टॅलेंट’ (NET) ह्या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या उत्तमता विकास व प्रज्ञा संवर्धनासाठी विज्ञान व गणित विषयांसाठी महाराष्ट्र ऑलिंपियाड अभियान (Maharashtra Olympiad Movement). गेल्या आठ वर्षात एकूण १ लाख १३ हजार विद्यार्थी सहभागी. आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिंपियाडमध्ये MKCL ने प्रशिक्षित केलेल्या विद्यार्थ्यांची भारतीय टिममध्ये सातत्याने निवड .
  • ‘सेटस्’ (SeTs - Secured eTendering System) सॉफ्टवेअर प्रणाली मार्फत MSEB व इतर शासकीय/ निमशासकीय सहकारी व खाजगी संस्थांना हजारो कोटी रुपयांच्या खरेदीसाठी ई-टेंडरिंग सेवा.
  • राजस्थान राज्य सरकारसोबत ‘राजस्थान नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड’ची (RKCL) स्थापना. आजपर्यंत राजस्थातील १८ लक्ष जिज्ञासू संगणक प्रशिक्षित.
  • ओरिसा राज्य सरकारसोबत ‘ओरिसा नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड’ची(OKCL) स्थापना. ओरिसातील ४००० शाळांमधील १२ लाखांहून अधिक विद्यार्थांना प्रतिवर्षी ICT अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण.
  • हरियाणामध्ये ‘हरियाणा नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड’ची(HKCL) स्थापना. डिजीटल साक्षरता कार्यक्रमाबरोबरच लक्षावधी युवकांना शासकीय सेवा अर्ज online भरण्याच्या पारदर्शक सेवा प्रथमच उपलब्ध. राज्यातील १४,५७६ शाळा, ७५ हजार शिक्षक आणि २० लाख विद्यार्थ्यांना परिवर्तन या प्रगत सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे शैक्षणिक दर्जा सुधारणेसाठी महत्वपूर्ण ई सेवा वितरीत.
  • सौदी अरेबिया मध्ये MKCL Arabia Limitedची स्थापना. अनेक सौदी विद्यापीठांशी शैक्षणिक सेवा करार व त्याअंतर्गत ४२ हजार सौदी विद्यार्थी-विद्यार्थिनी संगणक प्रशिक्षित.
  • गुजरात, कर्नाटक व गोवा राज्यांच्या माहिती-तंत्रज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी श्रम मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे MKCL ची परीक्षण संस्था म्हणून निवड
  • देशातील १७ राज्यांमध्ये MKCL आभ्यासक्रम स्थानिक भाषांतून कार्यान्वित.
  • ‘डिजीटल स्कूल’ (Digital School) या शालेय ई-शिक्षण प्रणालीला राष्ट्रीय पातळीवरील मानाचा eIndia पुरस्कार. ४०० शाळा व ३ लाख विद्यार्थ्यांसाठी ‘डिजीटल स्कूल’ कार्यान्वित.
  • श्रीलंका, सिंगापूर, घाना, इजिप्त या देशांमध्ये संयुक्त संस्थांसाठी सामंजस्य करार.

रोजगार निर्मिती

  • राज्यभर शहरी, निमशहरी व ग्रामीण भागातील २५ हजार युवकांना MKCL MS-CIT नेटवर्कमध्ये त्यांच्याच गावात माहिती तंत्रज्ञानावर आधारित हाय-टेक रोजगार व स्वयंरोजगार.
  • १ लाख युवकांना अप्रत्यक्षरित्या एम.के.सी.एल. नेटवर्कमध्ये त्यांच्या गावात रोजगार/व्यवसायाव्दारे उपजिविकेच्या संधी.